news-details
राजकारण

“आजची सभा आतापर्यंत झालेल्या शंभर सभांचा बाप आहे” ; उद्धव ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचं विधान!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा आज(शनिवार) सायंकाळी एमएमआरडीए मैदान, बीकेसी, वांद्रे पूर्व येथे जाहीर सभा होणार आहे. आजच्या सभेत उद्धव ठाकरे कोणावर निशाणा साधणार आणि राज्यातील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या सभेला उपस्थित राहण्यासाठी राज्याच्या विविध भागातून शिवसेना कार्यकर्ते येणार आहेत. दरम्यान या सभेबद्दल शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांना माहिती दिली. “आजची सभा ही क्रांतीकारी सभा असेल, आतापर्यंत झालेल्या शंभर सभांचा बाप अशी ही आजची सभा असणार आहे. या सभेतून सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील.” असं त्यांनी सांगितलं.

माध्यमांशी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, “ही सभा आतापर्यंत झालेल्या शंभर सभांचा बाप आहे. मुंबईत कोविडच्या काळानंतर इतक्या मोठ्या सभा झालेल्या नाहीत. शिवसेनेच्या मुंबईतील सभांची परंपरा विराट, अतिवराट अशी आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अशाप्रकारच्या जाहीर सभेला प्रथमच व्यासपीठावर येतील. आपण जर आजच्या सभेचं व्यासपीठ पाहाल तर आतापर्यंत इतकं मोठं व्यासपीठ हे मुंबईत निर्माण झालेलं नव्हतं. अशाप्रकारचं हे भव्य व्यासपीठ आहे. शिवसेनेचा संपूर्ण कारभार भव्य असतो. आज मैदानात उतरण्याच्या निश्चयाने, जिद्दीने या सभेचं आयोजन आहे.”

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments