news-details
आरोग्य

लवंगाचे आरोग्यदायी फायदे, कोणत्या वेळी आणि कशाप्रकारे सेवन करावं?

आपल्या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध होणारे गरम मसाल्याचे पदार्थ जेवणाची चव वाढवण्यासोबतच आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अनेक गरम मसाल्यांचा वापर आयुर्वेदामध्ये सुद्धा केला जातो. लवंग हा गरम मसाल्याचा पदार्थही प्रत्येक स्वयंपाक घरात पाहायला मिळतो. पण, इवल्याशा लवंगचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, हे अनेकांना माहित नसेल. तुम्ही लवंगाचा चहा पिऊन त्याचे सेवन केल्यासही तुम्हाला अनेक फायदे मिळतील. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

लवंगाचा चहा तयार करण्यासाठी पातेल्यामध्ये एक कप पाणी घ्या. उकळत्या पाण्यात 4-5 लवंग कुटून टाका. यामध्ये थोडंसं आलं किसून टाका. यासोबत थोडीशी दालचिनीही टाका. चहा छान उकळवून घ्या. आता हा गाळून यामध्ये एक चमचा मध मिसळून प्या. 

लवंग आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट (Antioxidant) आणि अँटीएनफ्लामेंट्री (Anti-Inflammatory) गुणधर्ण असतात. याचा सेवनामुळे पोट फुगणे, मळमळ, अपचन, उलट्या, जठरासंबंधी चिडचिड, अतिसार असे पोटाशी संबंधित आजारातून लवकर सुटका होते. यासोबतच सर्दी, खोकला, ब्राँकायटिस, सायनुसायटिस, दमा यासारख्या श्वसनविकारांवरही लवंग रामबाण उपाय आहे.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments