news-details
क्रीडा

एकच नंबर! हिटमॅनने रचला इतिहास; असा रेकॉर्ड करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ३ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना इंदूरच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने शानदार खेळ करत ६ गडी राखून विजय मिळवला आहे.

यासह टी -२० मालिकेत २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. टी -२० वर्ल्डकप २०२२ स्पर्धेनंतर टी -२० संघात कमबॅक करत असलेल्या रोहित शर्माला या सामन्यातही खातं उघडता आलेलं नाही. दरम्यान मैदानात उतरताच त्याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने २००७ मध्ये टी -२० क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. याच वर्षी भारतीय संघाने टी -२० वर्ल्डकपवर नाव कोरलं होतं रोहितने तेव्हापासून ते आतापर्यंत एकूण १५० टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १३९.१५ च्या स्ट्राईक रेटने ३८५३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ४ शतकं झळकावली आहेत. यासह २९ अर्धशतकं झळकावली आहेत. 

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments