news-details
व्यापार

मुकेश अंबानी विकतायत आपल्या ताफ्यातील 'ही' कंपनी; 2.2 कोटी डॉलर्सच्या करारावर मोहोर!

मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी: मुंबई : मुकेश अंबानी त्यांच्या साम्राज्यातील एक कंपनी विकणार आहे. अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज  लिमिटेडनं आपली एक कंपनी विकण्याची घोषणा केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या घोषणेनंतर मार्केटमध्येही चर्चांना उधाण आलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, REC सोलर नॉर्वे AS ला ओस्लो लिस्टिड Alkem AS ला सुमारे 22 अमेरिकन दशलक्ष डॉलर्सना विकणार आहे. REC नॉर्वे ही REC सोलर होल्डिंगची पूर्ण मालकी असलेली कंपनी आहे. ही कंपनी स्कॅन्डिनेव्हियन देशात पॉलिसिलिकॉनचं उत्पादन करते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिलायन्सची सब्‍स‍िडरी असलेल्या कपनीनं ऑक्टोबर 2021 मध्ये ही कंपनी खरेदी केली होती. रिलायन्सच्या युनिटनं ही कंपनी 771 दशलक्ष डॉलर्सच्या उलाढालीवर विकत घेतली होती. रिलायन्सच्या कंपनीनं तेल ते रिटेल समूहात आपली पकड आणखी मजबूत करण्यासाठी ही कंपनी खरेदी केली होती. 

रिलायन्सच्या सब्‍स‍िडरी कंपनीचा करार 
RIL ने आपल्या स्टॉक एक्स्चेंज फायलिंगमध्ये माहिती दिली की, REC Solar Holdings AS, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. त्यांनी 14 जानेवारी 2024 रोजी प्रति शेअर 100 रुपये दरानं शेअर्सच्या विक्रीसाठी Alkem ASA सोबत करार केला आहे. REC Solar Norway AS ला 22 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सना विकण्यासाठी करार करण्यात आला आहे.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments