news-details
लाईफ स्टाईल

भक्तांच्या आनंदावर विरजन! 'ऑनलाइन प्रसाद' अद्याप उपलब्ध नाही, राम मंदिर ट्रस्टची माहिती

मागील काही दिवसांपासून राम मंदिर अभिषेक सोहळ्याचा प्रसाद ऑनलाईन थेट घरापर्यंत पोहोचणार, अशी माहिती मिळतेय. त्यामुळे भक्तवर्गात मोठा आनंद देखील पाहायला मिळत आहे. पण, आता भक्तांच्या याच आनंदावर विरजन पडतंय. राम मंदिर (Ram Mandir) ट्रस्टने या ऑनलाईन प्रसादाबद्दल मोठा खुलासा केलाय. 


श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र (Ayodhya)  ट्रस्टने ऑनलाईन प्रसाद वितरणासाठी कोणताही प्लॅटफॉर्म अजून तयार केलेला नाही. ट्रस्टने प्रसादाचे ऑनलाइन वितरण करण्यासाठी कोणताही विक्रेता किंवा एजन्सी नियुक्त केलेली नाही, अशी माहिती ट्रस्टने दिली. भक्तांमधील ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे प्रसाद खरेदी करण्यासाठी हाणामारी होत असल्याची माहिती ट्रस्टच्या एका सदस्याने दिली आहे. 

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments