पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सकाळी पावणे अकराच्या सुमारास पंतप्रधान मोदी (PM Modi) सोलापुरात दाखल होतील. सोलापुरातल्या कुंभारीत साकारण्यात आलेल्या रे नगर गृहनिर्माण संस्थेतील पंधरा हजार घरांचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. सोलापुरातील कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बंगळुरुकडे रवाना होतील. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कामगारांचे शहर अशी सोलापूरची ओळख आहे. आधी सूतगिरणीमध्ये काम करणारे आता वस्त्रोद्योग, विडी उद्योग, बांधकाम अशा विविध क्षेत्रात हजारो कामगार सोलापुरात काम करत असतात. गरिबी पाचवीला पूजलेली असताना या कामगारांना मोडक्या तोडक्या घरांमध्ये राहण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र संपूर्ण आयुष्य झोपडपट्टीत घालवणाऱ्या या कामगारांचे स्वतःच्या हक्काचं घर स्वप्न साकार होताना पाहायला मिळत आहे. देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत सोलापुरातल्या रे नगर येथे साकारत आहे. या वसाहतीच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः सोलापूरला येणार असल्याची माहिती मिळत आहे.
0 Comments