news-details
General

पुणे: वाहून गेलेल्या रिक्षाचालकाचा शोध सुरु

पुण्यातील जनता वसाहत येथे रविवारी सायंकाळी एक रिक्षा कालव्यामध्ये पडल्याची घटना घडली. या दुर्घटनेमध्ये पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने रिक्षाचालक वाहून गेलाय. अग्निशामक विभागाच्या कर्मचार्‍याकडून रिक्षाचालकाचा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास जनता वसाहत येथे एका रिक्षाचालक प्रवाशाला सोडण्यास आला होता. तेथून वारजेकडे जातानाच्या मार्गावर हा अपघात घडला. या रिक्षाचालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या मुलांना वारजेकडे जाण्याचा रस्ता विचारला. त्यानंतर तो चुकीच्या दिशेने जात असल्याचं लक्षात आल्यानंतर रिक्षा वळवून तो मागे फिरत असतानाच रिक्षा कालव्यामध्ये पडली. रस्ता कच्चा असल्याने काही समजण्याच्या आतमध्ये रिक्षावाल्यासहीत रिक्षा कॅनॉलमध्ये कोसळली. ही घटना तेथील मुलांच्या डोळ्यांदेखतच घडली.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments