news-details
राजकारण

ईडीच्या कारवाया सुरु झाल्या की मुख्यमंत्री गळ्यात पट्टा का घालतात? नितेश राणेंचा सवाल 

सिंधुदुर्ग :  शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीमध्ये असलेले,  आरोपी भाजपचे आमदार नितेश राणे  यांना सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने ३० हजारांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केलं आहे. या प्रकरणावर नितेश राणे यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया मांडली आहे. नितेश राणे सध्या प्रकृती अस्वस्थ असल्याने कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचार घेत होते , आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. 

नितेश राणे म्हणाले की , हे १८ डिसेंबर   रोजी जेव्हा हे प्रकरण घडले तेव्हापासून मी पोलिसांना , संबंधित अधिकारयांना तपासकार्यात सहकार्य करत होतो मदत करत होतो. आणि या पुढेही करत राहणार आहे. कारण मी कोणत्याही ट्प्पास कार्यात अडथळा आणला नाही .  जामीन मंजूर केल्याबद्दल मी न्यायालयाचे आभार व्यक्त करतो. माझ्याकडे जी काही माहितीम होती ती मी सर्व पुरविली आहे. 
मी विधिमंडळाचा एक सदस्य असल्याने मला मतदारसंघात आणि समाजात एक जवाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी सहकार्य करत होतो. पोलिसांनी  मला अटक करण्याची गरज सुद्धा भासली नव्हती. मात्र सवोच्च न्यायालयाचे ४ दिवास  संरक्षण शिल्लक असताना ज्या कोर्ट आवारात अडविण्यात आली व माझ्या कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याचा प्रयत्न झाला.  मी स्वतःहून कोर्टापुढे शरण आलो , मला हे सरकारने अजूनही अटक करू शकलेले नाहीत.  मला फक्त दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली त्यानंतर मी न्यायालयीन कोठडीत होतो. 

माझ्या तब्येतीबद्दल जे काही विषय सुरु होते ते एकूण, मला आश्चर्य वाटले. मी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला असून, मी आता दोन दिवस माझ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणार असून, पुढील उपचारांसाठी मुंबईत जाणार आहे. लोकांना वाटत होते ककी नितेश राणे यांना जेलमध्ये जायचे नाही म्हणून राजकीय आजार काढला असे विरोधक म्हणत होते. 

हे सगळे बघता आम्ही सुद्धा विचारू शकतो की, जेव्हा सरकार पडायची वेळ येते आणि ईडीच्या कारवाया सुरु होतात तेव्हाच मुख्यमंत्री गळ्यांत बेल्ट का बांधतात हा प्रश्न आम्ही विचारू शकतो ? आणि जेव्हा ईडी कारवाया सुरु होतात तेव्हाच महाविकास आघाडीच्या नेत्यांना १४ दिवस कोरोना कसा काय होतो ? आणि अधिवेश सुरु असते तेव्हाच मुख्यमंत्री आजारी कसे पडतात ?  हे सर्व प्रश्न आम्ही त्यांना विचारू शकतो असे नितेश राणे यावेळी म्हणाले.  कोणाच्या तब्येतीबद्दल असे प्रश्नचिन्हब उपस्थित करणे हे कोणाच्या नैतिकतेमध्ये बसते का यावरून राजकारणाचा  स्तर  किती ढासळला आहे याचा विचार करण्याची गरज आहे. 

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments