news-details
राजकारण

पात्रता असतानाही सुप्रियाला सत्तेपासून बाजूला ठेवलं अन् कार्यकर्त्यांना संधी दिली : शरद पवार

 "मला लोक सांगायचे ताई तिसऱ्यादा निवडून आल्या असून, त्यांना संधी द्या. पण पात्रता असताना देखील स्वतःच्या मुलीला बाजूला ठेवले आणि कार्यकर्त्यांना संधी दिली. सलग आठवेळा संसदरत्न मिळाला. काहीना काही योगदान असेल ना?,असे म्हणत शरद पवारांनी आपल्या भावना कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवली आहे. शरद पवारांनी काल बारामतीतील पदाधिकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यावेळी ते बोलत होते. याचवेळी शरद पवार यांनी अजित पवार गटावर देखील जोरदार टीका केली आहे. 

दरम्यान याचवेळी अजित पवार गटावर टीका करतांना शरद पवार म्हणाले की,“ आज जे आपले लोक सोडून गेले आहेत, त्यांना आपण सत्तेत राहण्याची संधी दिली की नाही?, आज तिकडच्या गटात म्हणजे अजित पवारांच्या गटात अनेकजण मनाने नाहीत पण भीतीने तिकडे आहेत. काहीजण मनाने नाहीत पण सत्तेसाठी आहे. काहीजण मनाने नाहीत पण पदामुळे तिकडे आहेत. काहीजण विचार मांडणी करू शकत नाही, असे शरद पवार म्हणाले.

याचवेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, "लढाई करायला जिद्द लागते, जे लढाई करायला येणार आहेत त्यांची जिद्द गेली आहे. जो आपल्या विरोधात प्रचार करेल त्याचा हात थरथर कापेल आणि तो मनाला विचारेल कुणाच्या विरोधात आपण प्रचार करतोय. 1980 साली मी इंग्लंडला गेलो तेव्हा 70 होते, परत आल्यावर फक्त 6 जण राहिले. जे गेलं यांच्या जागी नवीन निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कुणी केली? महाराष्ट्र मध्ये पोहोचवली कुणी? सर्वसामान्य जनतेला सत्तेच्या खुर्चीवर बसवले कुणी? सगळ्या समाजाच्या लोकांना अनेकांना सत्तेतच्या खुर्चीवर बसवले. काही लोकांना जाणीवपूर्वक संधी द्यायची असती आणि दिली आहे. त्यांच्या काही चुका झाला तरीही आपण संधी दिली. मला लोक सांगायचे ताई तिसऱ्यादा निवडून आल्या, त्यांना संधी द्या. पण पात्रता असताना देखील स्वतःच्या मुलीला बाजूला ठेवले पण कार्यकर्त्यांना संधी दिली. सलग आठवेळा संसदरत्न मिळाला, काहीना काही योगदान असेल ना?, असा प्रश्न देखील पवारांनी उपस्थित केला. 

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments