वाल्हे :- आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदरच्या जेजुरी येथील शरदचंद्रजी पवार महाविद्यालय जेजुरी च्या राष्ट्रीय सेवा योजनचे विशेष शिबिर दौंडज ता.पुरंदर जिल्हा पुणे येथे आयोजित केले आहे. या शिबीरात व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत प्रा. सुभाष कदम ,प्रा.डाॅ. अतुल चौरे ,प्रा.सचिन जगताप ,प्रा.किरण गाढवे श्री दिनेश जाधव शरद जाधव यांनी मनोगते व्यक्त केली.
याप्रसंगी प्रा.सुभाष कदम म्हणाले की माझ्या गावात शिबीर आयोजित केले आहे त्यामुळे मला आनंद आणि अभिमान वाटत आहे. अशा शिबीरारातूनच आमची जडणघडण झाली. त्यातूनच सामाजिक प्रश्नांची जाणीव होते. स्वत:मधील परिवर्तनाचा मार्ग आणि स्वतःचा शोध अशा शिबीरातून लागतो, असे मत मांडले.
प्रा. किरण गाढवे यांनी , प्रलोभनाला बळी न पडता ध्येया पर्यंत आपण पोहचा. आपल्याला प्रेरणा कशापासून , कोणाकडून घ्यावी , यासाठी अशी शिबीरे मदत करतात असे सांगितले.
0 Comments