news-details
General

शिवाजी महाराजांचे विचार अंगीकारले पाहिजेत : सरपंच सोमनाथ कणसे यांचे प्रतिपादन.

दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी चोरवाडी ( ग्रामपंचायत जवळार्जुन) येथे शिवजयंती साधेपणाने परंतु अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जवळार्जुन ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सोमनाथ कणसे होते. शिवाजी महाराज महाराजांचे विचार आपण अंगीकारले पाहिजेत. शिवाजी महाराज सर्व जाती धर्माचे होते आपण पुढे जात असताना सर्वांना बरोबर घेऊन चालले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. पुढच्या वर्षी विविध कार्यक्रम घेऊन शिवजयंती साजरी करू, याप्रसंगी लागेल ती मदत देण्याचे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.याप्रसंगी सचिन जगताप यांनी  शिवाजी महाराजांचे कृषी विषयक धोरण आणि संतांचे स्वराज्य निर्मितीमध्ये योगदान याविषयी विचार व्यक्त केले. जवळार्जुन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नारायण गुळूमकर यांनी शिवाजी महाराजां प्रमाणे संघटन कौशल्य आपण आत्मसात केले पाहिजे. युवकांचे संघटन झाले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments