news-details
राजकारण

जितेंद्र आव्हाडांच्या बालेकिल्ल्याला पडणार भगदाड, तब्बल 22 नगरसेवक लागले शिंदे गटाच्या गळाला!

स्थानिक महापालिकांच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यात आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे शिवसेनेला खिंडार पडलेले असताना आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या बालेकिल्ल्यात मोठे भगदाड पडणार आहे. ठाण्यात राष्ट्रवादीचे तब्बल 22 नगरसेवक पक्षाची साथ सोडण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये आता राजकीय वातावरण तापायला लागले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष टार्गेटवर आला आहे. तब्बल 22 नगरसेवक राष्ट्रावादी पक्षाची साथ सोडणार अशी माहिती समोर आली आहे. हा गट वेगळा गट स्थापन करणार अथवा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार अशी शक्यता आहे. या 22 पैकी 6 नगरसेवक लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहे. हे 6 ही नगरसेवक दिग्गज आहे.

विशेष म्हणजे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना शह देण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची मोठी खेळी मानली जात आहे. मुंब्रा आणि कळवा येथील अनेक नगरसेवकांसह शेकडो NCP पदाधिकारी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वाटेवर आहे. ठाणे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांची शिवसेना पक्ष इतर पक्षांना सुरुंग लावण्याच्या तयारीत आहे.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments