शिवसेना आमदार अपात्रतेचे प्रकरण उच्च न्यायालयात: मुंबई : आमदार अपात्रतेबाबतच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निकालाविरोधात शिवसेना शिंदे गटानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. शिंदे गटानं ठाकरेंच्या आमदारांविरोधात 13 याचिका दाखल केल्या होत्या, या 13 याचिकांवर आज तातडीची सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीत उच्च न्यायालयानं सर्व प्रतिवाद्यांना नोटीस धाडली असून 8 फेब्रुवारीपर्यंत याचिकांवर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, याप्रकरणाची पुढची सुनावणी 8 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
शिवसेना शिंदे गटानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिंदे गटाचे व्हिप भरत गोगावले यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला आव्हान देण्यात आलं आहे. आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाला गोगावलेंच्या याचिकेतून आव्हान देण्यात आलं आहे. शिंदे गट हाच खरी शिवसेना असल्याचं सिद्ध होतंय, तर त्यांचा व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र का केलं नाही? असा प्रश्न या याचिकेतून करण्यात आला आहे. आम्हीच खरी शिवसेना असल्यानं ठाकरे गटाच्या त्या 14 आमदारांना निलंबित करण्याची याचिकेतून मागणी करण्यात आली आहे.
0 Comments