news-details
इतर

मराठवाड्यात 32 हजार कुणबी नोंदीपैकी 18 हजार प्रमाणपत्र वाटप; विशेष मोहीम राबवणार

राज्यात सापडलेल्या 54 लाख कुणबी नोंदींचे  प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता सरकारने पाऊल उचलायला सुरुवात केलीय. मराठवाड्यातील ज्या गावांमध्ये कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत, त्या गावातील सर्व पात्र लोकांची यादी गावस्तरावर लावण्यात आली आहे. गावोगावी दवंडी दिली जात आहे. आतापर्यंत मराठवाड्यात  32 हजार नोंदी सापडल्या आहेत, त्यातील 18 हजार लोकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहेत. उर्वरित लोकांनाही लवकरात लवकर हे प्रमाणपत्र मिळावेत यासाठी पुढचे 15 दिवस मराठवाड्यात विशेष मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती मराठवाडा विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड (Madhukarraje Ardad) यांनी दिली आहे

कुणबी नोंदी धारकांच्या वारसांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र वितरीत करण्याचे काम सद्यःस्थितीत सुरु आहे. आढळून आलेल्या नोंदींवरुन वारस शोधण्यासाठी महसूल विभाग, भूमी अभिलेख विभागातील खासरा पहाणी, पाहणीपत्रक, कुळ रजिष्टर, जुने फेरफार, सातबारा, टिपण, गुणाकार बुक, योजना व सलेवार या अभिलेख्यांच्या आधारे अर्जदारांना मदत होत आहे. 

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments