news-details
आरोग्य

पुण्यात थंडीनं रेकॉर्ड मोडला, यंदा सर्वात कमी तापमानाची नोंद, शिवाजीनगरचं तापमान किती?

पुणे जिल्ह्यात कडाक्याची थंडीमध्ये वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांत पुणे शहराच्या तापमान सातत्याने घट होत आहे. पुण्यातील अनेक ठिकाणावरील तापमान  10 ते 14 अंश सेल्सिअस दरम्यान आले आहे. वाढत्या थंडीमुळे ग्रामीण भागासह शहरी भागातही शेकोट्या पेटविल्या जात आहे. थंडीसोबत धुक्याचे प्रमाणही वाढलेय. हडपसर, खेड,चिंचवड, आबेगाव,  बालेवाडी, इंदापूर, पाषाण, माळीण, एनडीएसह अनेक ठिकणाचा पारा प्रचंड घसरलाय. हुडहुडी लागल्यामुळे पुणेकरांनी कपटात ठेवलेले स्वेटर बाहेर काढले आहेत. ग्रामीण भागासह शहरी भागात शेकोट्या पेटवल्या जात आहेत. 

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे पुण्यातील किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली होती. शहराचे किमान तापमान 18 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यामुळे थंडी गायब झाली होती. मात्र मागील आठव्यापासून तापमानात हळूहळू घट झाली. सध्याच्या घडीला पुण्यातील तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली आलेय. एनडीए, पाषाण आणि हवेली भागातील तापमान 9 च्या आसपास आहे

 

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments