news-details
Tech World

प्रजासत्ताक दिनासाठी मुलांकडून अशी घ्या करून ऑनलाइन किंवा ऑफलाइन भाषणाची तयारी

२६ जानेवारी २०२२ रोजी देश आपला ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. या दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली होती. तेव्हापासून हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचं औचित्य साधत शाळा आणि महाविद्याल्यात भाषणं, निबंध स्पर्धा आणि वादविवाद कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. या दिवशी विद्यार्थी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून करोनाचं संकट असल्याने अनेक ठिकाणी ऑनलाइन शाळा आणि महाविद्यालयं सुरु आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी ऑफलाइन शाळा महाविद्यालयं सुरु करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे मोजक्यात विद्यार्थ्यांच्या उपस्थित हा दिन साजरा केला जाणार आहे. यासाठी भाषण देण्यासाठी  काही विद्यार्थी ऑफलाइन, तर काही विद्यार्थी ऑनलाइन भाषण देण्यासाठी तयारी करत आहेत .

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments