news-details
राजकारण

डॉ.राजेंद्र भोसले यांचा नाशिक विभागातील उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून गौरव

 अहमदनगर दि. 25 - जिल्ह्यातील निवडणूक शाखेतील विविध घटकांनी केलेल्या निरंतर जनजागृती व  कामामुळे जिल्ह्यातील मतदारांची संख्या 35 लाख 57 हजारांच्या पूढे गेली आहे. जिल्हयाची मतदार यादी अधिक दोषविरहीत आणि सर्व समाज घटकांना सामावून घेण्यावर भर देण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी आज येथे दिली. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिन 25 जानेवारी 2022 निमित्ताने मतदार दिन कार्यक्रमाचे आयोजन जिल्हातधिकारी कार्यालयातील राजस्वि सभागृहात करण्यात आले होते. योवळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार चंद्रशेखर शितोळे, नायब तहसीलदार प्रशांत गोसावी, शंकर थोडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमापूर्वी मूख्यल राज्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने औरंगाबाद येथे दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या राज्यवस्तरीय कार्यक्रमात अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना नाशिक विभागातील  उत्कृष्ट जिल्हा निवडणूक जिल्हाधिकारी पुरस्कार जाहीर करण्यात आला.

 यावेळी मतदार जनजागृती विषयी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी श्री. भोसले म्हणाले, 2021 या वर्षभराच्या कालावधीत आपल्या अहमदनगर जिल्हयात मतदार यादीच्या निरंतर पुनरिक्षण कार्यक्रम आणि  नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यात विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमामध्ये ज्या नागरिकांची नावे मतदार यादीत नाही अशा 18 वर्ष वय पूर्ण झालेल्या सर्व नागरीकांची नाव नोंदणी करण्याची कार्यवाही करण्यात आली. यासाठी  18 वर्ष वय पूर्ण झालेले कॉलेज युवक, युवती, महिला, अपंग आणि तृतीयपंथी यांचेसाठी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आलेले होते. तसेच ग्रामसभांचे देखील आयोजन करण्यात आलेले होते. जिल्हयातील सर्व 7 मतदार नोंदणी अधिकारी, 14 सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि 3722 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी  यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments