मुंबई : राज्यातील कॅम्पस पुन्हा बहरणार असून महाविद्यालये 1 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहेत , अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. करोनाच्या नियमांचे पालन करून महाविद्यालये सुरू होणार असल्याचे नवे आदेश काढण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच शाळा सुरु करण्याला परवानगी दिली . शाळांबाबत निर्णय झाल्यानंतर कॉलेजही सुरू करण्यााबाबत राज्य सरकारकडून हलचाली सुरू होत्या. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तसा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांपुढे ठेवला होता, अखेर त्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्याने कॉलेज सुरु होणार आहेत .
0 Comments