news-details
राजकारण

नितेश राणे यांना सुप्रीम कोर्टाकडून धक्का आणि दिलासा ; सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली तर शरण येण्यासाठी १० दिवसांची मुदत

नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. नितेश राणे यांना आता मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली आहे. याचवेळी सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांनी दिलासाही दिला आहे. कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात शरण येण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली आहे. तोपर्यंत नितेश राणेंना अटक करता येणार नाही.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments