news-details
आरोग्य

मुंबई अनलॉक कधी होणार?; महापौर किशोरी पेडणेकर म्हणतात…

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील करोना रुग्णांची संख्येत दररोज घट होत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेने या महिन्याच्या अखेरीस शहरातील निर्बंध कमी करण्याचा आणि शहर अनलॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महापौर किशोरी पेडणेकर यांनी माहिती दिली आहे.

“मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या महिन्याच्या अखेरीस मुंबई अनलॉक होईल. मुंबईतील निर्बंध हटवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. परंतु लोकांनी मास्क घालणं आणि सुरक्षित अंतर पाळणं बंधनकारक असेल,” असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर एएनआयशी बोलताना म्हणाल्या.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments