news-details
राजकारण

विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित जवळार्जुन, नव निर्वाचित संचालकांचा सत्कार विद्यमान सरपंच श्री सोमनाथ कणसे हस्ते .

जवळार्जुन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित जवळार्जुन, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेची सन २०२१-२२ ते २०२६-२७ या कालावधीसाठी संचालक निवडणूक नुकतीच बिनविरोध करण्यामध्ये पुरंदरचे विद्यमान आमदार माननीय संजयजी जगताप सर यांना यश आले. या निवडणुकी साठी तब्बल ३८ उमेदवारी अर्ज आले होते, परंतु तालुक्याच्या आणि जवळार्जुन गावामध्ये राजकारणात सक्रिय असलेले सर्व मोठे पुढारी लोक, जेष्ठ मंडळी आणि संचालक पदा साठी इच्छूक असलेल्या अन्य सर्व सोसायटी खाते धारकांचा मेळ बसवण्यात विद्यमान आमदार साहेबांना उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी यश आले.

बिनविरोध झालेल्या या निवडणुकीमध्ये गावचे विद्यमान सरपंच श्री सोमनाथजी कणसे यांच्या वार्डमधून १३ पैकी तब्बल ६ उमेदवार निवडून आले आहेत. काल या सर्व नव निर्वाचित संचालकांचा सत्कार माननीय सरपंच साहेब यांनी आयोजित करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी नवनिर्वाचित संचालक श्री महादेव कोंडे, श्री मामासो गुळूमकर, श्री दिलीप निंबाळकर सर, श्री सोमनाथजी राणे आणि सौ यशोदा साळुंके यांचा सत्कार करण्यात आला.  नवीन संचालक मंडळाने गावातील सर्व सामान्य माणसापर्यंत या संस्थेचा लाभ कसा पोचवता येईल, सर्व गरजू शेतकरी बांधवाना हेलपाटे न मारायला लागता नियमा प्रमाणे कर्ज वाटप होण्यासाठी प्रयत्न करावेत आणि दर वर्षी या संस्थेमार्फत होणारी एकूण कर्ज वाटप, व्याज दर, एकूण वसूली, थकबाकी, मोठे थकबाकीदार याचा लेखा जोखा सर्व सामान्य सदस्यापर्यंत पारदर्शकपणे कसा पोचवता येईल हे पाहावे असे प्रतिपादन सरपंच श्री सोमनाथजी कणसे यांनी केले.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments