news-details
देश-विदेश

जागतिक बँकेकडून युक्रेनला ७२ कोटी ३० लाख डॉलर्सचं कर्ज मंजूर

युद्धामुळे युक्रेनमधून बाहेर पडलेल्या लोकांची संख्या १७ लाखांहून अधिक झाली असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितविषयक संस्थेने म्हटले आहे.२४ फेब्रुवारीला रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून इतर देशांमध्ये आश्रय घेतलेल्या लोकांची संख्या सुमारे १७ लाख ३५ हजार असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितविषयक उच्चायुक्तांनी (यूएनएचसीआर) सोमवारी सांगितले. रविवारी हीच संख्या १५ लाख ३० हजार होती.

बाहेर पडलेल्या लोकांपैकी जवळपास तीन पंचमांश, म्हणजे सुमारे १० लाख ३० हजार लोक पोलंडमध्ये, १ लाख ८० हजार लोक हंगेरीमध्ये, तर १ लाख २८ हजार लोक स्लोव्हाकियात गेले आहेत.

जागतिक बँकेकडून युक्रेनला ७२ कोटी ३० लाख डॉलर्सचं कर्ज मंजूर

युक्रेनला ७२ कोटी ३० लाख डॉलर्सचं दशलक्ष अनुदान आणि कर्ज वित्तपुरवठा मंजूर केला आहे, असं जागतिक बँकेने म्हटलंय.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments