दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, शिंदे, फडणवीस आणि अमित शहांच्या बैठकीत आता पंकजा मुंडेंची एंट्री | जितेंद्र आव्हाडांच्या बालेकिल्ल्याला पडणार भगदाड, तब्बल 22 नगरसेवक लागले शिंदे गटाच्या गळाला | दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, शिंदे, फडणवीस आणि अमित शहांच्या बैठकीत आता पंकजा मुंडेंची एंट्री | जितेंद्र आव्हाडांच्या बालेकिल्ल्याला पडणार भगदाड, तब्बल 22 नगरसेवक लागले शिंदे गटाच्या गळाला | दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, शिंदे, फडणवीस आणि अमित शहांच्या बैठकीत आता पंकजा मुंडेंची एंट्री |
रशिया युक्रेनदरम्यानचं युद्ध सुरू असून अनेक देशातील लोक युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या लोकांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. भारत ऑपरेशन गंगा राबवून नागरिकांना मायदेशी परत आणत आहे. दरम्यान, सुमी शहरातून अडकलेल्या नागरिकांना स्थलांतरीत करण्याचा पहिला टप्पा सुरू झाल्याची माहिती युक्रेन सरकारने मंगळवारी दिली. यात ६९४ भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान, एका पाकिस्तानी मुलीनंही भारतीय दूतावासाचे आणि पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.
पाकिस्तानच्या अस्मा शफीकने तिला युक्रेनमधून बाहेर काढल्याबद्दल किव्हमधील भारतीय दूतावास आणि पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहेत. भारतीय अधिकार्यांनी तिची सुटका केली आहे आणि देशाबाहेर काढले. लवकरच ती तिच्या कुटुंबाला भेटणार आहे, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने दिली आहे. एएनआयने या मुलीचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
0 Comments