news-details
राजकारण

रामदेव बाबांचं शिवसेना प्रमुखांबद्दल मोठं विधान, म्हणाले “महाराष्ट्रात उद्धव ठाकरे…”

योगगुरू रामदेव बाबा योग शिबिरासाठी रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ऐतिहासिक पतितपावन मंदिर या ठिकाणच्या वीर सावरकर स्मारक आणि लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाला भेट दिली. यावेळी रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं.

“पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला यश मिळेल असं एग्झिट पोलमधून दिसत आहे. काही लोकांना वाटलं होतं पाच राज्यांमध्ये भाजपा रसातळाला जाईल पण तसं होत नाहीये. सोशल मिडियावर तसं चित्र दाखवण्याचा प्रयत्न होतोय, मात्र तसं होणार नाही. भाजपासोबत केजरीवाल सुद्धा चांगली कामगीरी करतील,” असं रामदेव बाबा यावेळी म्हणाले.

“काँग्रेसला राज्य स्तरावर नेतृत्वाचा अभाव आहे. राष्ट्रीय स्तरावर नेतृत्वात ओजस्वीत मिळाली तर काँग्रेस अधिक बळकट होईल. या निवडणुकीत सर्वांना आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळेल,”असं मत रामदेव बाबा यांनी व्यक्त केलं. दरम्यान पाच राज्यांच्या निकालावर अधिक बोलणं त्यांनी टाळलं.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे चांगलं काम करत असल्याची कौतुकाची थाप रामदेव बाबा यांनी यांनी यावेळी दिली. दरम्यानं महाराष्ट्रात सुरु असलेल्या केंद्रीय यंत्रणांच्या धाड सत्रावर बोलताना दोन वजीर लढत आहेत असं ते म्हणाले. वीर सावरकर हे भारतरत्न असून त्यांना भारतरत्न मिळायला हवं, आज ना उद्या याची घोषणा नक्की होईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments