news-details
राजकारण

योगी पुढे जाणार हे नक्की होतं – संजय राऊत

 उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली असून दुपारपर्यंत निकालांचा कल स्पष्ट होईल. यामधील सर्वाधिक लक्ष हे उत्तर प्रदेशच्या निकालाकडे असणार आहे. एग्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपाचं सरकार येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान उत्तर प्रदेश वगळता चारही राज्यांमध्ये काँग्रेसने ज्येष्ठ नेत्यांना ‘तैनात’ केलं आहे.

उत्तर प्रदेश विधानसभेत ४०३ जागा असून पक्षांना बहुमतासाठी २०२ सदस्यांचे संख्याबळ लागेल. बहुतांश मतदानोत्तर अंदाजानुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र यावेळी भाजपासमोर गेल्या निवडणुकीतील संख्याबळ राखण्याचं आव्हान आहे.

योगी पुढे जाणार हे नक्की होतं - संजय राऊत

योगी पुढे जाणार हे नक्की होतं, पण अखिलेश यादव यांची चांगली कामगिरी असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. उत्तर प्रदेशचा निकाल ५ नंतर स्पष्ट होईल त्यानंतर बोलणं योग्य ठरेल असंही ते म्हणाले आहेत

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments