अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन यांनी एक गंभीर इशारा दिला आहे. रशियाने जर रासायनिक शस्त्रांचा वापर केला तर त्याची रशियाला मोठी किंमत चुकवावी लागेल असं बायडन म्हणाले आहे. अमेरिका युक्रेनमध्ये रशियाशी लढणार नाही. तसंच नाटो आणि क्रेमलिनच्या दरम्यान भिडल्यास तिसरं महायुद्ध होईल, असा इशाराही ज्यो बायडन यांनी दिला आहे. तसंच युक्रेनसोबतच्या लढाईत रशिया कधीच जिंकणार नाही, असंही बायडन म्हणाले आहेत.
२४ फेब्रुवारी रोजी रशियाच्या सैन्याने युक्रेनवर हल्ला केला. २७ फेब्रुवारीला मॉस्कोने युक्रेनमधली दोन वेगळी क्षेत्रं डोनेट्स्क आणि लुहान्स्कला स्वतंत्र देश म्हणून घोषित केलं. शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ज्यो बायडन यांनी सांगितलं की आम्ही युरोपात आमच्या सहकाऱ्यांना पाठिंबा देणं सुरूच ठेवणार आहोत. आम्ही संपूर्ण ताकदीनिशी नाटो क्षेत्राच्या इंच न इंच भागाचं रक्षण करू आणि नाटोमधल्या अन्य देशांनाही यासाठी प्रेरित करू. त्यांनी सांगितलं की आम्ही युक्रेनमध्ये रशियाच्या विरोधात युद्धात प्रत्यक्ष सहभागी होणार नाही. बायडन यांनी सांगितलं की नाटो आणि रशिया थेट भिडल्यास तिसर महायुद्ध होईल. आम्ही ते रोखण्याचा प्रयत्न करू.
0 Comments