किडनी म्हणजेच मूत्रपिंड हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. किडनी निकामी झाल्यास आपलं जगणं अवघड होतं. रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त द्रव फिल्टर करून रक्त स्वच्छ करणे आणि लघवीद्वारे टाकाऊ पदार्थ बाहेर काढणे हे किडनीचे मुख्य कार्य आहे. किडनी एक प्रकारे फिल्टरचे काम करते, ज्यामुळे रक्त शुद्ध आणि संतुलित राहते.
किडनी रक्त फिल्टर करते आणि सोडियम, कॅल्शियम आणि इतर घटक लघवीद्वारे शरीरातून काढून टाकतात. जेव्हा रक्तातील या घटकांचे प्रमाण वाढते तेव्हा ते किडनीमध्ये जमा होतात आणि त्याचा गोळा बनतो. त्याला किडनी स्टोन म्हणतात.
जेव्हा किडनीचा म्हणजेच मूत्रपिंडाचा त्रास होतो तेव्हा त्याची लक्षणे शरीरात दिसू लागतात. लघवी करताना हलके दुखणे, वारंवार लघवीला जाणे, पोटात तीव्र वेदना, भूक न लागणे, मळमळ आणि ताप ही मुख्य लक्षणं आहेत. किडनी निरोगी ठेवण्याचा उत्तम उपाय म्हणजे जास्तीत जास्त पाणी पिणे. किडनी स्टोनचा त्रास असलेल्या व्यक्तीने दिवसातून किमान ८-९ ग्लास पाणी प्यावे. तुम्हालाही किडनी स्टोनचा त्रास असेल तर आहारात काही पदार्थ खाणे टाळा. हे पदार्थ तुमची समस्या वाढवू शकतात.
कोल्ड्रिंक्स पिणे टाळा:
जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास असेल तर आहारात कोल्ड्रिंक्स टाळा. कोल्ड्रिंक्समध्ये असलेले फॉस्फोरिक ऍसिड स्टोन तयार होण्याचा धोका वाढवते.
कॉफी आणि चहा टाळा:
ज्या लोकांना स्टोनची समस्या आहे, त्यांनी कॉफी आणि चहा टाळावा. कॉफी किंवा चहामध्ये असलेले कॅफिन शरीरातील डिहायड्रेशनची समस्या वाढवू शकते, ज्यामुळे किडनी स्टोनच्या रुग्णांना जास्त वेदना होऊ शकतात.
प्रथिनांचे सेवन कमी करा:
किडनी स्टोनचा त्रास असलेल्या रुग्णांनी आहारातील प्रथिनांचे प्रमाण कमी करावे. प्रथिनांच्या सेवनामुळे किडनीवर परिणाम होतो. अधिक प्रथिने खाल्ल्याने, शरीरातून लघवीद्वारे अधिक कॅल्शियम काढून टाकले जाते. प्रथिनांच्या सेवनाने शरीरात प्युरीन एन्झाईम्सचे प्रमाण वाढते, त्यामुळे यूरिक अॅसिड वाढू लागते आणि किडनीमध्ये स्टोनचा आकार वाढू लागतो.
मिठाचे सेवन कमी करा:
जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास होत असेल तर मिठाचे सेवन मर्यादित करा. जंक फूड, कॅन केलेला खाद्यपदार्थ आणि स्नॅक्समध्ये जास्त मीठ वापरले जाते, ते खाणे टाळा.
या भाज्या आहारातून वगळा:
टोमॅटो, वांगी, कच्चा तांदूळ, राजगिरा, आवळा, सोयाबीन, अजमोदा, चिकू, भोपळा, सुकी फरसबी, उडीद डाळ, हरभरा आणि राजमा हे या भाज्या आणि कडधान्य किडनी स्टोनचा त्रास असलेल्या रुग्णांनी खाणं टाळावं.
0 Comments