news-details
राजकारण

जिंकून आल्यानंतर योगी बॅक इन अ‍ॅक्शन! शाळेचं अनधिकृत बांधकाम बुलडोझरने पाडलं

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत बुलडोझर हा चर्चेचा विषय होता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जे चुकीचे काम करतात, सरकारी जमिनीवर ताबा मिळवतात किंवा बेकायदेशीरपणे बांधकाम करतात त्यांच्यावर बुलडोझर चालविला जाईल, असे म्हटले होते. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या दणदणीत विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा बुलडोझर फिरू लागला आहे. बेकायदा बांधकामे बुलडोझरने पाडण्याचे काम सुरू झाले आहे.

आग्रा येथील मॉल रोडवरील अँथनी गर्ल्स स्कूलने नोटीस देऊनही बेकायदा बांधकाम न हटवल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पथकाने शनिवारी शाळेच्या आवारातील सायकल स्टँड, स्टेज आणि गार्ड रुमचे बांधकाम बुलडोझरने जमीनदोस्त केले. सुट्टीच्या दिवशीही केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. शाळा प्रशासनाला वेळ न देता ही कारवाई करण्यात आल्याचे शाळा प्रशासनाचे म्हणणे आहे. तर यानंतर पुन्हा एकदा पुढील पाच वर्षे सरकारी जमिनीवर किंवा बेकायदा बांधकामांवर बुलडोझर सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments