ग्रीन हायड्रोजन फ्युएल सेल (Hydrogen based Fuel Cell Electric car) वर चालणारी देशातील पहिली कार टोयोटा मिराई (Toyota Mirai) बुधवारी परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आली. ही कार टोयोटा आणि किर्लोस्कर यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे. मिराई शब्दाचा जपानी भाषेत अर्थ भविष्य असा होतो त्यामुळे या गाडीला मिराई ते नाव देण्यात आले आहे.
टोयोटाने भारतातील पहिले हायड्रोजन (पाणी) इंधन सेलवर चालणारे इलेक्ट्रिक वाहन Mirai लाँच केले. या टोयोटा मिराई कारमध्ये हायड्रोजन इंधन सेल बॅटरी पॅक दिला आहे. विशेष म्हणजे इलेक्ट्रिक कारपेक्षा या वाहनाची रेंज जास्त आहे. ही कार सिंगल चार्जमध्ये ही 600 किमी पर्यंत चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे. या कारमध्ये हायड्रोजनचे रुपांतर विजेमध्ये होते, ज्यामुळे इंजिनला शक्ती मिळते. यातून फक्त पाणी बाहेर टाकले जाते त्यामुळे ही कार पुर्णपणे पर्यावरण पूरक आहे. कारमध्ये ऑनबोर्ड वीज तयार होते, ज्यावर कार चालवली जाते. कारच्या मागील बाजूस 1.4 kWh बॅटरी बसवण्यात आली आहे. ही बॅटरी इलेक्ट्रिक वाहनापेक्षा 30 पट कमी आहे. एका सिलेंडरमध्ये 5.6 किलो हायड्रोजन भरला जातो. इतक्या इंधनात ही कार 600 किमी प्रवास करते.
0 Comments