news-details
राजकारण

‘कश्मीर फाईल्स’बाबतच्या वादावर नाना पाटेकरांचं परखड मत; म्हणाले, “हिंदु आणि मुसलमान…”!

१९९०मध्ये काश्मीरमधून काश्मिरी पंडितांना आपली घरं-दारं सोडून बाहेर पडावं लागल्याच्या घटनेचं चित्रण करणारा ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट सध्या चर्चेत आणि काहीसा वादात सापडला आहे. या चित्रपटातल्या विषयावरून देशात समर्थनार्थ आणि विरोधात असे दोन गट पडले आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हा चित्रपट सगळ्यांनी पाहावा, असं म्हटलं असताना तो टॅक्सफ्री करण्याची मागणी होऊ लागली आहे. दुसरीकडे काही राज्यांनी याला विरोध केला आहे. त्यात महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांनी या चित्रपटावर आणि वादावर परखड भूमिका मांडली आहे.

नाना पाटेकर यांनी पुण्यातल्या सिम्बायोसिसमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना नाना पाटेकर यांनी ‘कश्मीर फाईल्स’वरून सुरू असलेल्या वादावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.

“चित्रपट मी पाहिलेला नाही, पण…”

“हा चित्रपट मी पाहिलेला नाही. त्यामुळे मला त्याबद्दल सविस्तर बोलता येणार नाही. तो पाहिला असता तर मला सांगता आलं असतं. पण एखाद्या चित्रपटाबद्दल असा वाद होणं बरोबर नाही”, असं नाना पाटेकर म्हणाले आहेत.

“मला वाटतं की इथले हिंदू आणि इथले मुसलमान हे इथलेच आहेत. त्यांनी एकत्र राहाणं गरजेचं आहे. त्यांनी एकत्रच राहावं. गट होत असतील तर ते चुकीचं आहे”, असं देखील नाना पाटेकर यांनी नमूद केलं.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments