news-details
राजकारण

“इस्लाम हा देशाचा खरा शत्रू आहे, संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहून…”; संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी इस्लाम धर्माबद्दल आणि मुस्लिमांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. संभाजी महाराज बलिदानासंदर्भात पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना संभाजी भिडेंनी, “आजही ज्या इस्लामच्या पोटतिकडीतून औरंगजेबने संभाजी महाराजांचं बलिदान केलं तो इस्लाम हा आपल्या देशाचा खरा शत्रू आहे,” असं म्हटलंय. भिडे यांच्या या वक्तव्यावरुन नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

“संभाजी महाराजांचा बलिदान मास आपण पाळतोय. त्याच्यात हिंदुस्तानच्या अस्तित्वाला असलेलं आव्हान दडलेलं आहे. औरंगजेब आणि संभाजी ही दोन माणसं होती, त्यांचं वैर होतं म्हणून औरंगजेबने संभाजी महाराजांना तुकडे तुकडे करुन मारलेलं नाहीय. त्याच्या अंतकरणातील इच्छा होती ती वेगळी होती. कन्याकुमारी ते काश्मीर असा उभा देश तुकडे तुकडे करुन हा हिंदू धर्म, हिंदू समाज आणि हिंदीूस्थान संपवून टाकावा ही त्याच्या पोटातील आग आणि चीड, दृष्ट भावना त्याने संभाजी महाराजांच्या बलिदानातून पूर्ण करुन घेत अंशत: समाधान मिळवलं,” असं भिडे संभाजी महाराजांच्या बलिदानाबद्दल बोलताना म्हणाले.

“आपण लक्षात घेतलं पाहिजे आज संभाजी महाराज नाहीयत, औरंगजेब नाहीय. मेलेली मढी कशाला उकरुन काढायची, आता नवीन युग आहे. नवीन जगासोबत चालूयात, जुनं झालं गेलं विसरुन नव्या जगाबरोबर चालूयात असं म्हणणारी नादान, नालायक, देशघातकी वृत्ती सुशिक्षित लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे,” असं म्हणत संभाजी भिडेंनी सुशिक्षितांवर टीका केली.

“संभाजी महाराज, औरंगजेब नाहीय. पण औरंगजेब आजही पाकिस्तान, बांगलादेश गाव वस्त्यांमधील मुस्लिमांच्या रुपाने आजही शिल्लक आहे.
परंतु संभाजी महाराजांची जी आग होती ज्यात त्यांनी ऐन तारुण्यात आपल्या देशाचा आणि धर्माचा अभिमान न सोडता, न झुकता, न मागे सरकाता, न शरण जाता त्यांनी देश देवाचा अभिमान मनात धरुन मरण पत्करं परंतु इस्लाम स्वीकारला नाही. आजही ज्या इस्लामच्या पोटतिकडीतून औरंगजेबने संभाजी महाराजांचं बलिदान केलं. तो इस्लाम हा आपल्या देशाचा खरा शत्रू आहे,” असंही भिडे म्हणाले. “हा शत्रू अनेक रुपात गावोगावी हिंदुस्तानमध्ये नांदतोय, हिंदुस्तानच्या बाहेरही नांदतोय,” असंही ते पुढे म्हणाले.

“इस्लामला त्याच पोटतिकडीने उत्तर देण्याची ताकद हिंदू समाजात संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहून आपण मिळवली पाहिजेत आणि ती मिळते. संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहणं ही स्वातंत्र्याची उपासना आहे, ही धर्माची, मातृभूमिची उपासना आहे,” असं संभाजी भिडेंनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे, “संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहणं ही अत्यंत प्रखर राष्ट्राभिमान उत्पन्न करणारी गोष्ट आहे. ती आपण करुयात आणि एक दिवस असा उजाडावा की झालेल्या बलिदानाचा सूड घेणारा हिंदुस्तान उभा रहावा ही अंतकरणामध्ये भावना धरुन आपण वाटचाल करत राहूयात,” असं आवाहनही भिडेंनी केलंय.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments