news-details
राजकारण

खडकवासलामध्ये भर रस्त्यावर कोयता फिरवणारे जेरबंद

किरकटवाडी : सिंहगड रस्त्यावरील खडकवासला गावातील मंडईतून कोयते फिरवत दहशत निर्माण करुन फरार झालेल्या आरोपींना हवेली पोलीसांनी डोणजे फाटा परिसरातून जेरबंद केले आहे. गौरव राकेश चव्हाण (वय 21), विशाल सिद्धु बनसोडे (वय 23), परशुराम चिलाप्पा सोनकांबळे (वय21), सौरभ कोंडीबा कांबळे (वय 20) (सर्व राहणार लमाणवस्ती, खडकवासला), गणेश अशोक शेळके (वय 28, रा. तळजाई वसाहत मुळ रा. डोणजे ता.हवेली) आणि विलास कोंडीबा मरगळे (वय 20, रा. आडमाळ ता. मुळशी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. एका अल्पवयीन आरोपीला समजपत्र देऊन सोडून देण्यात आले.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments