news-details
व्यापार

महात्मा गांधींचा एकेरी उल्लेख करत बंडातात्या कराडकरांची टीका; नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

महात्मा गांधी यांच्या अहिंसावादामुळे नाहीतर क्रांतिकारकांमुळे स्वातंत्र्य मिळाले आहे. महात्मा गांधींचा अहिंसावाद आणि हिंदुत्व हे दोन्ही पक्षपाती आहेत, असे वादग्रस्त विधान बंडातात्या कराडकर यांनी पुण्याच्या खेडमध्ये केले आहे. क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे हुतात्मा गेले त्या शहीद दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानादरम्यान बंडातात्या बोलत होते. आपल्या भाषणामध्ये महात्मा गांधींच्या कार्याचा उल्लेख करताना वाद निर्माण होतील अशी विधानं केली आहेत.

“भगतसिंग यांनी केलेली क्रांती अभूतपूर्व आहे. सुरुवातीला त्यांच्या मनामध्ये महात्मा गांधींची छाप होती. महात्मा गांधींच्या अहिंसावादी धोरणाची भगतसिंग यांच्या मनावर छाप होती. आपल्याला हे स्वातंत्र्य अहिंसक मार्गाने मिळवायच आहे, असं भगतसिंग यांना वाटायचे. पण, भगतसिंगाच्या भ्रमाचा भोपळा तीन वर्षांमध्ये फुटला,” असं बंडातात्या यांनी म्हटलंय. “१९२२ ला एक हत्याकांड झालं. त्या हत्याकांडात समर्थन देण्यासाठी म्हणून महात्मा गांधींनी नकार दिला. तेव्हा, भगतसिंग हे महात्मा गांधींवर नाराज झाले. महात्मा गांधींच्या अहिंसावाद आणि महात्मा गांधी यांचं हिंदुत्व हे दोन्ही पक्षपाती आहेत,” असं विधान बंडातात्या यांनी हे उदाहरण देत म्हटलंय.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments