news-details
राजकारण

“राज्यपालांच्या पदावर होते म्हणून नाहीतर…”; सावित्रीबाई फुलेंसंदर्भातील वादग्रस्त वक्तव्यावरुन नाना पटोलेंचा टोला

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंनी बुलढाण्यातील खामगांव येथे सुरु असणाऱ्या ओबीसी समाज अधिकार संमेलनामध्ये बोलताना टीका केली. सावित्रीबाईंचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला केंद्राने अजूनही राज्यपालपदी ठेवलंय, असा टोला पटोले यांनी नाराजी व्यक्त करताना लगावला.

वाईट वाईट गोष्टी राज्यपाल बोलले…
ओबीसी समाज अधिकार संमेलनातील भाषणादरम्यान नाना पटोलेंनी राज्यपालांनी ज्योतिबा आणि सावित्रीबाईंबद्दल वाईट वक्तव्य केल्याचा संदर्भ देत टीका केली. “केवळ महाराष्ट्राच नाही तर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी या देशाला दिशा देण्याचं काम केलं. त्या सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलताना आपल्या राज्यांचे राज्यपाल म्हणाले एवढ्या कमी वयात लग्न झालेलं त्यांचं. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल एवढ्या वाईट वाईट गोष्टी राज्यपाल बोलले,” असं नाना पटोले म्हणाले.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments