news-details
राजकारण

शरद पवार UPA चे अध्यक्ष होणार?

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा एकत्र येण्यासंबंधी चर्चा सुरु झाली आहे. भाजपाला आव्हान द्यायचं असेल तर पर्यायी आघाडी उभी करण्यासंबंधी पुन्हा एकदा दिल्लीत चर्चा सुरु झाली असून यावेळी मोठी घडामोड समोर आली आहे. विरोधकांची एकी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यातच आता शरद पवारांनी संयुक्त पुरोगामी आघाडीचं (UPA) अध्यक्षपद घ्यावं यासाठी प्रस्ताव संमत करण्यात आला आहे.

दिल्लीत मंगळवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवारदेखील उपस्थित होते. याच बैठकीत शरद पवारांकडे यूपीएचं अध्यक्षपद सोपवण्याचा ठराव मांडण्यात आला आणि संमतही करण्यात आला. त्यामुळे एकीकडे काँग्रेसच्या नेतृत्तावरुन वादंग सुरु असतानाच दुसरीकडे शरद पवारांकडे युपीएच्या नेतृत्वावरुनही घमासान होण्याची शक्यता आहे.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments