मुंबई : करोनाच्या साथीमुळे विस्कळीत झालेले शैक्षणिक वेळापत्रक आता हळूहळू सुरळीत होऊ लागले असून यंदा बहुतेक शिक्षण मंडळाच्या परीक्षा प्रत्यक्ष होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर परीक्षा, ताण या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. परीक्षा पे चर्चा या उपक्रमाचे पाचवे सत्र शुक्रवारी होणार आहे.
नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम इथे १ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता प्रत्यक्ष उपस्थितीत राहून पंतप्रधान मोदी देशातील निवडक विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याशी संवाद साधणार आहेत, असे सूचना कार्यालयाच्या पश्चिम विभागाच्या अतिरिक्त महा संचालक स्मिता वत्स-शर्मा यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या संबंधित प्रश्नांना पंतप्रधान या कार्यक्रमात उत्तर देतील. यंदा प्रथमच, देशातील विविध राजभवनात, निवडक विद्यार्थ्यांना राज्यपालांच्या समवेत हा कार्यक्रम पाहण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक डॉ. राहुल तिडके यांनी यावेळी दिली.
0 Comments