news-details
राजकारण

डोळ्यात डोळे घालून बोलू शकता का? विचारणाऱ्या संजय राऊतांना अमित शाहांनी दिलं उत्तर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी राज्यसभेत बोलताना गुन्हेगारांच्या डिजिटल डाटा गोळा करण्याबाबतच्या विधेयकावर बोलताना मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं नाव घेत “तुम्ही आमच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकता की कायद्याचा गैरवापर होणार नाही आणि होत नाहीये” असा सवाल केला. दरम्यान त्यांच्या या प्रश्नाला अमित शाह यांनीदेखील उत्तर देताना डोळ्यात डोळे घालून आधी प्रश्न विचारा, असं प्रत्युत्तर दिलं.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments