news-details
कृषी

मी ऊस बोलतोय... कवी दत्ता टरले.

मी ऊस बोलतोय.. ही सुंदर कविता कवी दत्ता टरले यांनी लिहली आहे.  या कवितेत ऊसाचा आपल्या मालका विषयीचा जिव्हाळा व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांसाठी आपलं पीक किती महत्वाचं असत हे यामधून कवी दत्ता टरले यांनी व्यक्त केलं आहे.

पेरी होऊन आलो
सरित मला टाकलं,
मालकाने माझ्या
जीवापाड राखलं
 

मला फुटले कोंब
मालक झाले खुश,
कर्जाच्या दरीतून मला
काढेल म्हणे ऊस..
 

मला आली नवती
झालो हिरवा गार,
मालकाच्या आनंदला
नाही राहिला पार
 

रात्री बे रात्री मला
मालक पाणी देई,
उधारी ने खात घेऊन
माझी काळजी घेई
 

मी आलो वाढ्यात
आनंद होता वाड्यात,
माझ्या भारोसे मालक फिरे
शावकराच्या पुढ्यात
 

मी झालो मोठा
प्रकार असा घडला,
माझ्या सावलीला बसून
मालक माझा रडला..
 

मालक मला तोडा
अन् कर्ज तुमचं फेडा,
माझ्याच साखरेचा
अना एक पेडा...
 

तोड काही येईना
घेऊन कोयता सुरा,
मी ही झालो म्हातारा
फुटला मला तुरा
 

मालकाला माझ्या वाचवा
वाऱ्याने मी डोलतोय..
ऐका माझी कळकळ
मी ऊस बोलतोय...
मी ऊस बोलतोय...

आवडली तर नक्की share करा .

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments