पाकिस्तानमधील सत्तापालट निश्चित झाल्यानंतर विरोधी आघाडीच्या संयुक्त बैठकीत शाहबाझ शरीफ यांचे नाव पंतप्रधान पदासाठी निश्चित करण्यात आल्यानंतर त्यांनी पंतप्रधानपदासाठी अर्ज दाखल केलाय. आज पंतप्रधानपदी कोण विराजमान होणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे. मात्र शाहबाझ शरीफ यांनी अर्ज दाखल केल्यानंतर आणि पंतप्रधानपदी विराजमान होण्याआधीच भारताविरोधात गरज ओकली आहे. काश्मीरच्या मुद्द्यावरुन शाहबाझ शरीफ यांनी वक्तव्य केलं असून त्यांच्या या वक्तव्यावरुन नवीन पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारत पाकिस्तान संबंध चिघळतील की काय अशी शक्यता व्यक्त होऊ लागली
0 Comments