news-details
राजकारण

भोंगा प्रकरणावरील मतभेदांनंतर वसंत मोरेंना ‘शीवतीर्थ’वर पाहताच राज ठाकरेंनी उच्चारे ‘ते’ तीन शब्द;

दुपारी १२ च्या सुमारास त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीदरम्यान नेमकं काय घडलं याबद्दल टीव्ही ९ मराठीशी बोलताना वसंत मोरेंनी सविस्तर माहिती दिली. “भेट झाली तेव्हा राज ठाकरेंचा पहिला शब्द काय होता? भेट झाली त्यापूर्वी तीन चार दिवस चर्चा सुरु होत्या. त्यामुळे तुम्ही राज ठाकरेंसमोर गेलात तेव्हा ते नेमकं काय म्हणाले?”, असा प्रश्न वसंत मोरेंना विचारण्यात आला.

या प्रश्नाचं उत्तर देताना वसंत मोरे यांनी, “बोल, काय रे” असं म्हणत राज ठाकरेंनी विचारपूस केल्याचं सांगितलं. “मला नेहमी राज ठाकरेंकडून हाच शब्द हवा असतो. बोल, काय रे.. अन् या भेटीत त्यांनी हाच पहिला प्रश्न विचारला,” असं वसंत मोरे म्हणाले. तसेच पुढे बोलताना या भेटीदरम्यान तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली की असं विचारण्यात आलं असता, “माझ्या मनात प्रश्न नव्हते. ते प्रसारमाध्यमांनी निर्माण केलेले. मी राज ठाकरेंसोबतच आहे,” असं उत्तर वसंत मोरेंनी दिलं.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments