news-details
राजकारण

शिवसैनिकांकडून भाजपा नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला, हल्ल्यात कोणतीही इजा नाही

महाराष्ट्र: भाजपा नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. मोहित कंबोज हे उत्तर भारतीय भवन येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते तिथून परतताना हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मोहित कंबोज जात असताना कलानगर येथील सिग्नलवर थांबले असता मातोश्री बाहेर असलेल्या शिवसैनिकांनी कंबोज यांची गाडी ओळखून गाडी गाठली आणि शिवीगाळ करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत कोणालाही कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही.

शिवसैनिकांनी मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला करताच पोलिसांनी त्या दिशेने धाव घेत मोठा अनुचित प्रकार होण्यापासून रोखण्यात आलंय. यावेळी जमलेल्या शिवसैनिक कंबोज यांना शिवीगाळ करत असल्याच देखील दिसून येत आहे. जेव्हा भोंग्याचा विषय सुरू झाला तेव्हा कंबोज हे मोफत भोंगे वाटण्यावरून चर्चेत होते. तसेच अनेक वेळा कंबोज यांनी शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांवर आरोप देखील केले आहेत.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments