मोबाइल गेमच्या नादात पुण्यातील एका तरुणानं गुन्हेगारी कृत्य केलं आहे. त्यानं मोबाइलवर गेम खेळण्यासाठी मोबाइल संच उपलब्ध नसल्याने एका पादचारी महिलेचं मंगळसूत्र हिसकावलं आहे. मंगळसूत्र हिसकावल्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला होता. पण पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आरोपी तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. नवीन मोबाइल संच खरेदी करण्यासाठी त्यानं महिलेचं मंगळसूत्र हिसकावल्याची धक्कादायक माहिती पोलीस चौकशीत दिली आहे. अजय राजू शेरावत असं अटक केल्या १८ वर्षीय आरोपी तरुणाचं नाव आहे. तो पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील हिंगणगाव येथील रहिवासी आहे. त्यानं दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर परिसरात एका पादचारी महिलेचं मंगळसूत्र हिसकावलं होतं. मंगळसूत्र हिसकावल्यानंतर तो दुचाकीवरून फरार झाला होता. याप्रकरणी पीडित महिलेनं पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.
0 Comments