news-details
राजकारण

सांगली-मिरजेसह जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात

सांगली : सांगली-मिरजेसह जिल्ह्यात मंगळवारी रमजान ईद मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. शाही ईदगाह मैदानावर ईद-उल-फित्रची नमाज अदा करण्यासाठी हजारो मुस्लिम बांधव जमले होते. मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत राजकीय नेतेही ईदगाह मैदानावर उपस्थित होते.
मिरज शहरातील शाही ईदगाह मैदानावर खुदबा पठन मौलाना बुरहानुद्दीन खतीब साहेब यांनी केले तर नमाज पठण मौलाना कारी इरफान बरकाती यांनी केली. या वेळी समाजात शांतता नांदावी, यासाठी दुवा करण्यात आली. या वेळी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर अधीक्षिका मनीषा डुबुले, उप अधीक्षक अशोक वीरकर, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक रविराज फडणीस, तहसीलदार दगडू कुंभार आदी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, जनसुराज्य युवाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, रिपब्लिकन पक्षाचे नेते माजी महापौर विवेक कांबळे आदी उपस्थित होते.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments