news-details
राजकारण

गुजरातमध्ये मंदिरात लाऊडस्पीकरवरुन आरती केल्याने बेदम मारहाण करत हत्या; पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील एका गावात मंदिरात लाऊडस्पीकर वापरून आरती करत असल्याने एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. हिंदू मंदिरात लाऊडस्पीकर वाजवल्याच्या कारणावरून एका ४२ वर्षीय व्यक्तीला त्याच्याच समुदायातील सदस्यांनी बुधवारी बेदम मारहाण केली. गुजरातमधील मंदिरांमध्ये लाऊडस्पीकर वाजवण्यावरून हिंसाचार झाल्याची आठवडाभरातील ही दुसरी वेळ आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मेहसाणाच्या लंघनाज पोलिसांनी सांगितले की, मृत जसवंतजी ठाकोर हे रोजंदारी मजूर होते. पोलिसांनी जसवंतचा मोठा भाऊ अजित याचा जबाब घेतला आणि गुरुवारी सदाजी ठाकोर, विष्णूजी ठाकोर, बाबूजी ठाकोर, जयंतीजी ठाकोर, जवानजी ठाकोर आणि विनुजी ठाकोर यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. जोटणा तालुक्यातील लक्ष्मीपारा गावातील मुदर्डा टेबावलो ठाकोरवास येथील रहिवासी अजित यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सात वाजता ही घटना घडली.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments