news-details
व्यापार

सर्वसामान्यांना आणखी एक झटका; घरगुती LPG सिलिंडरचे भाव पुन्हा वाढले

LPG Price Hike: देशातील नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचा सामना करावा लागणार आहे. कारण आता घरगुती सिलेंडरचे (Domestic Gas Cylinder) भाव ५० रुपयांनी महाग झाले आहेत. शनिवारी तेल कंपन्यांद्वारे एलपीजी गॅस सिलेंडरचा (LPG Gas Cylinder) भाव ५० रुपयांनी वाढवण्यात आला आहे. यासोबतच आता मुंबईत १४.२ किलोंचा सिलेंडर ९९९.५० म्हणजेच जवळपास १००० रुपयांना मिळणार आहे. तर दिल्लीतही ९९९.५० रुपयांना गॅस मिळणार आहे.

मार्च २०२२ मध्येही सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्याच वेळी, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत गेल्या आठवड्यात १०२ रुपयांनी वाढ करण्यात आली होती, त्यानंतर त्याची किंमत २२५३ रुपये करण्यात आली होती. सर्वसामान्य नागरिक पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईचा सामना करत असताना एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. आता एलपीजीच्या वाढलेल्या किमतीही सर्वसामान्यांचा खिसा रिकामी करण्यासाठी पुरेशा आहेत.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments