भाजपने राष्ट्रपतींना मान दिला नसला तरी आम्ही तसं करणार नाही, येत्या 22 जानेवारीला नाशिकमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते महाआरती करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. नाशिकला जायच्या आधी शिवनेरीत जाऊन शिवमंदिराचे दर्शन घेणार असल्याचंही ते म्हणाले.
अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा ही केवळ राममूर्तीची नाही, तर राष्ट्राची प्राणप्रतिष्ठा आहे. देशाच्या अस्मितेच्या प्राणप्रतिष्ठेचा हा सोहळा आहे. ह्यावेळी राष्ट्रपतींना अयोध्येत आमंत्रित करावं. आम्ही काळाराम मंदिरात जी आरती करणार आहोत, त्यावेळी राष्ट्रपतींनी उपस्थित राहावं, अशी आम्ही पत्राद्वारे मागणी करीत आहोत, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.
आम्ही सुद्धा नाशिकला काळाराम मंदिर येथे दर्शन करणार आहोत, कार्यक्रम करतो आहोत, त्याला सुद्धा राष्ट्रपती यांना आम्ही रितसर निमंत्रण देत आहोत. आमचे खासदार रितसर निमंत्रण देतील. राष्ट्रपती यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करावी, अशी आमची मागणी आहे. याआधी सुद्धा तसा झालं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, येत्या 22 तारखेला दिवाळी साजरी करा असं आवाहन केलं आहे. पण त्याच्या आधी यांनी गेल्या 9 वर्षात काय दिवाळं काढलंय त्यावर चर्चा करा. तुमच्यामध्ये जर काही आत्मविश्वास असेल तर त्यावर चर्चा करा. तुमच्या योजनांचं काय झालं त्यावर चर्चा करा
चोराच्या हाती धनुष्यबाण, शिवसैनिकाच्या हाती मशाल, आता या गद्दारांची घराणेशाही गाढली पाहिजे. या भगव्याला कलंक लावणारी औलात पुन्हा वळवणार नाही हे पाहा असं उद्धव ठाकरे म्हणाले.
0 Comments