news-details
क्रीडा

यशस्वी अन् शिवमचा मैदानातील धुमाकूळ पाहून जगाला धडकी भरवणारे रोहित-विराट पाहतच राहिले!

टीम इंडियाने अफगाणिस्तानविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबेनं केलेल्या धुवाँधार फटकेबाजीनं एकतर्फी विजय मिळवताना मालिकाही खिशात घातली. दुसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाने 173 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 15.4 षटकात 6 गडी गमावून विजय मिळवला. शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वालने केलेल्या फटकेबाजीने कॅप्टन रोहित शर्मा आणि किंग कोहली सुद्धा अवाक् होऊन गेले होते. 

टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार पूर्णतः यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे राहिले. इंदुरच्या मैदानात दोघांनी षटकार अन् चौकारांची अक्षरश: आतषबाजी केली. यशस्वी जैस्वालने अवघ्या 34 चेंडूत 68 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने तब्बल सहा सिक्स आणि पाच चौकार मारले. शिवम दुबेनेही सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी तडाखा दिला. त्याने अवघ्या 32 चेंडूत नाबाद 63 धावांची खेळी केली. त्याने सुद्धा पाच चौकार आणि चार षटकार ठोकले. त्यामुळे टीम इंडियाला 173 धावांचे आव्हान सहजपणे पार करता आले. शिवम दुबेनं तीन चेंडून तीन षटकार ठोकत मैदान दणाणून सोडले. 

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments