news-details
राजकारण

देशातल्या लोकांची उपसमार घालवण्यासाठी मोदींनी 10 दिवस उपवास करावा, शरद पवारांचा टोला

देशातील लोकांची उपासमार घालवण्यासाठी  मोदींनी उपवास करावा : शरद पवार
 राममंदिराच्या (Ram Mandir)  कामाचा निर्णय राजीव गांधी (Rajiv Gandhi)  यांच्या काळात झाला. आता भाजप (BJP)  आरएसएस (RSS)  त्याचा मतांसाठी फायदा घेत आहेत अशी टीका शरद पवार यांनी केलीय. गरिबी घालवण्यासाठी सरकार असा कार्यक्रम हाती घेईल का असा सवाल शरद पवारांनी केला. देशातल्या लोकांची उपसमार घालवण्यासाठी मोदींनी 10 दिवस उपवास करावा असा टोला पवारांनी लगावला. बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथील उत्तम पाटील आणि रावसाहेब पाटील यांच्या सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. 

धार्मिक प्रश्नावर लोकांची मनं वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अयोध्येचा श्रीराम, हनुमान यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. अयोध्येतील मशीद पडल्यानंतर इथं राम मंदिर बांधण्याबाबतचा निर्णय राजीव गांधी यांच्या वेळी झाला आहे. राजीव गांधी यांच्या हस्ते शिलान्यास झाला. राम मंदिराचे काम  बाजूला राहिले मात्र आता भाजप आणि आरएसएस याचा मतासाठी फायदा करून घेत आहेत, अशी टीका शरद पवारांनी केला आहे.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments