मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशीने निघणाऱ्या पायी दिंडीला अवघ्या चार दिवसांचा काळ शिल्लक राहिला असतानाच, मनोज जरांगे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझ्यावर ट्रॅप लावला जातोय, सरकार मोठं षडयंत्र रचत असल्याचा गंभीर आरोप जरांगे यांनी केला आहे. विशेष म्हणजे काही मराठा समन्वयक यांचे नाव न घेता त्यांच्यावर देखील जरांगे यांनी आरोप केले आहे.
याबाबत बोलतांना जरांगे म्हणाले की, "मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार काहीतरी षडयंत्र रचत असल्याची मला माहिती आहे. मात्र, त्याला अधिकृत मानलेलं नाही. मी खोलात जाऊन हे खरं आहे का? याची माहिती घेत आहे. मात्र, मला खात्रीलायक माहिती मिळाली आहे की, सरकार खूप मोठं षडयंत्र रचणार आहे. कारण मी सरकारला मॅनेज होत नाही आणि फुटत देखील नाही. मराठा समाजाच्या जीवावर राजकारण करणारे, मराठा समाजाचे जीवावर मोठे झालेले, ज्यांच्या दुकानदाऱ्या होत्या त्या सगळ्या बंद पडल्या आहे. अशा लोकांचा असंतोष असून, त्यांना मी आतून खपत नाही. मी आरक्षणाचा मुद्दा संपवायला निघाल्याने या लोकांना खूप वाईट वाटत आहे. या लोकांना मराठा आरक्षणाचा विषय संपू द्यायचा नव्हता असे त्यांच्या डोक्यात विचार होता असे मला वाटत असल्याचे जरांगे म्हणाले.
0 Comments