news-details
तंत्रज्ञान

FASTag यूजर्ससाठी अत्यंत महत्वाची बातमी, याच महिन्यात करा हे काम, अन्यथा महागात पडेल!

रस्त्यावर वाहन चालवताना टोल टॅक्स भरणे आवश्यक असते. अनेकदा टोल भरण्यासाठी लांबच लांब रांगा असतात. त्यामुळे टोल भरण्यासाठी FASTag वापरले जाते. वाहनावर FASTag असल्यावर तो स्टिकर स्कॅन होऊन टोल आपोआप बँक अकाउंटमधून कट होतो. परंतु आता FASTag युजर्संना केवायसी करणे महत्त्वाचे आहे.
तुम्हीही FASTag वापरत असाल तर तुम्हाला केवायसी करणे अनिवार्य आहे. यासाठी अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२४ आहे. जर तुम्ही केवायसी अंतिम तारखेच्या आत न केल्यास तुम्हाला टोल भरण्यास अनेक अडचणी येऊ शकतात.

 

NHAI च्या नुकत्याच आलेल्या अहवालात एकाच वाहनासाठी अनेक FASTtag जारी करण्यात आल्याचे दिसून आले. यासोबतच आवश्यक KYC प्रोसेस पूर्ण न करता FASTtagचे वितरण करण्यात आले आहे. यामुळे आरबीआयच्या नियमांचे उल्लघंन होत आहे. यामुळे जुन्या FASTagला ब्लॅकलिस्ट केले जाणार आहे. तसेच वाहनांच्या विंडशिल्डनर FASTtag लावल्या नसल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे टोलनाक्यांवर टोल भरण्यास विनाकारण विलंब होतो. यामुळेच हा नवीन निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय राष्ट्रिय प्राधिकरणाने one vehicle one FASTag मोहिमेवर भर दिला आहे.

 

NHAI च्या अहवालानुसार, ३१ जानेवारीनंतर फक्त नवीन फास्टटॅग खाते सक्रिय राहील. पूर्वीचे फास्टटॅग खाते निष्क्रिय केले जातील.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments